चौफेर न्यूज –

येथील राजमाता रमाई महिला मंचतर्फे गौतम नगरातील भागाई शाळेत एक दिवसीय किशोरवयीन मुलींचे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर नुकतेच झाले. शिबिरात आरोग्य, भविष्यातील संधी, लैंगिक शिक्षण व महिला अत्याचार कायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले..

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नजूबाई गावित होत्या. याप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, विलास चव्हाण, डॉ. पिंगला देसाई, ॲड.रसिका निकुंभे, राजमाता रमाई महिला मंचच्या अध्यक्षा वंदना भामरे आदी उपस्थित होते.

यावेळी विलास चव्हाण म्हणाले, मुलींनी या वयात आपल्या स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेतला पाहिजे. आपल्या आवडी-निवडीचे हक्क, अधिकार आपण आत्मनिर्भरपणे बजावले पाहिजेत. जितेंद्र सोनवणे यांनी भविष्यातील संधींविषयी माहिती दिली. डॉ. पिंगला देसाई यांनी लैंगिक शिक्षण व आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. ॲड. निकुंभे यांनी महिला अत्याचार कायद्याबाबत माहिती दिली. यावेळी गौतमी ढिवरे या विद्यार्थिनीने ‘स्त्री मुक्तीचे उद्गातक डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. नजूबाई गावित यांनी महिला व मुलींसाठी व्यक्तिमत्व विकासाची आवश्यकता प्रकट केली. सूत्रसंचालन सचिव शांतीकमल बैसाणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen + four =