चिंचवड : चिंचवड मधून प्रसिद्ध होणार्‍या कुंभश्री मासिकाच्या महिला विशेषांकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. 16 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता रामचंद्र सभागृह, रस्टन कॉलनी, बिजलीनगर रोड, चिंचवड येथे होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांची कन्या व सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पाटील थोरात उपस्थित राहणार आहेत. माधुरी दरेकर, कार्याध्यक्ष, कुंभार समाज महासंघ, बचतगट राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या कमल कुंभार यांची कार्यक्रमास मुख्य उपस्थिती असणार आहे. अध्यक्षस्थान महिला गृहउद्योग लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते भूषविणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन  रंजना जाधव, बीना राजे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 + one =