चौफेर न्यूज कॅन्सरच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुक्सानाला वाईट अनुभव आला आहे. तिच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असताना पत्नी व दोन मुलांना एकटे सोडून पतीने पळ काढला आहे. सध्या रुक्साना वायसीएम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून मुलगा अरमान आणि मुलगी अंजूमला शिवाजीनगरच्या अनाथ आश्रमात जाण्याची वेळ आली आहे.

वैजापुर (औरंगाबाद) मधील रुक्सानाची सिध्दार्थनगरच्या (उत्तरप्रदेश) चा असलेला सलीम शेख यांच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचे रुपातंर प्रेमात झाले. त्या दोघांनी लग्नही केले. दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकून सलीम व रुक्साना मदारीच्या करमणुकीचे खेळ करीत होते. त्यावरच तब्बल दहा ते बारा वर्षे संसाराचा गाडा दोघेही हाकत होते. त्या दोघांच्या सुखी संसारात अरमान, अंजूम अशी एक मुलगा व मुलगीही त्यांना झाली. त्या मुलांना घेवून गावोगावी भटकत ते उदरनिर्वाह करीत होते.

मदारीच्या करमणुकीचे खेळ करीत ते दोघे पुण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून पिंपरी चिंचवडमधील कासारवाडीत वास्तव्य करु लागले. दररोज सकाळी लवकर उठून शहरातील चौकाचौकात मदारीच्या करमणुकीचे खेळ करुन नागरिकांकडून मिळणा-या तुंटपुज्या पैशावर चैाघांच्या पोटांची भूक भागवित होते. चौघे अगदी आनंदात राहत होते. मात्र, त्यांच्या सुखी संसारात अचानक विरजन पडले होते. रुक्साना सतत आजारी पडू लागली. सलीमकडे तिच्यावर उपचार करण्याइतपत पैसे उपलब्ध नव्हते.

त्यामुळे पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मती रुग्णालय (वायसीएम) सलीमने रुक्सानाला उपचारासाठी २८ एप्रिलला दाखल केले. तेव्हा तिला कॅन्सर झाल्याचे सलीमला समजताच, त्याने रुक्सानासह दोन्ही मुलांना सोडून पळ काढला आहे. तो अद्याप रुग्णालयाकडे फिरकला देखील नाही. सध्या रुक्साना वायसीएमच्या आयसीयू दोनमध्ये मरण यातना भोगत आहे. तर रिअल लाईफ रिअल पिपल संस्थेकडून रुक्सानाची काळजी घेतली जात आहे.

दरम्यान, रुक्साना व सलीम या दांपत्यला अरमान (वय ७) तर अंजुम (वय ५) एक मुलगा व एक मुलगी आहे. त्या दोघांनाही पुण्याच्या महिला व बालकल्याण समितीकडे अर्ज करुन अनाथ आश्रमात ठेवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 3 =