चौफेर न्यूज – दिल्लीतल्या केरळ भुवन या ठिकाणी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची भेट घेण्यासाठी हातात चाकू घेऊन एका व्यक्तीने राडा केला. विमल राज असे या ४६ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. विमल राजच्या एका हाती चाकू होता तर दुसऱ्या हाती कागदपत्रे होती. खिशात तिरंगा घेऊन तो विमल राज केरळ भुवनमध्ये पोहचला. सुरक्षा रक्षकांनी त्याला आत शिरण्यासाठी मनाई केली तरीही तो जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवले. त्याला पाठीमागून येऊन पकडले आणि त्याचे हात बांधले.

विमल राज या व्यक्तीच्या हातात मिळालेल्या कागदपत्रांवरून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे समजते आहे. त्याला उपचारासाठी दिल्लीतील शहादारा येथे Institute of Human Behaviour and allied Sciences मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − 17 =