चौफेर न्यूज – केरळमध्ये निपाह संसर्गाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. एका बाजूला या संसर्गाच्या रोग्यांवर उपचार करणारी परिचालिका लिनी पुथस्सेरीच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त होत आहे. तर दुसर्‍या बाजूला अशा उपचारामध्ये सहभागी असणार्‍या परिचालिकांवर बहिष्कार टाकण्याचे प्रकारही समोर येत आहेत. आतापर्यंत या आजाराने 12 जणांचे बळी गेल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोझीकोडमध्ये रुग्णालयातून घरी जाणार्‍या परिचालकांना बसमध्ये घेण्यास इतर प्रवाशांनी प्रचंड विरोध केला. जर त्यांना बसमध्ये घेतले तर आम्ही बसमध्ये बसणार नाही, अशी प्रवाशांनी भूमिका घेतली. यामुळे काही काळा वादाचा प्रसंग निर्माण झाला होता.

बसमध्ये हा अनुभव आला असतानाच आता रिक्षाचालकही परिचालकांना रिक्षामध्ये घेण्यास तयार नाहीत. निपाह संसगर्र् झालेल्या रुग्णावर उपचार करणार्‍या परिचालकांनाही त्याचा संसर्ग झाल्याची भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे त्या आपल्या संपर्कात आल्यास आपल्यालाही याची लागण होण्याची त्यांना भीती वाटते.

पर्यटकांनी फिरविली पाठ

निपाह संसर्गामुळे केरळकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे, अशी माहिती पर्यटन व्यवसायाशी संबंधित सूत्रांकडून देण्यात आली आहे. या आजाराबाबत सोशल मीडियावर जोरदार पोस्ट पडत असल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तब्बल 50 ते 60 टक्के पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केले आहे. यामध्ये आखाती देशासह काही विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. ऐन सुट्टीच्या मोसमात निपाह संसर्गामुळे पर्यटनक्षेत्राशी संबंधित व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मृतदेह दफन करण्यासही नकार

निपाहच्या संसर्गाने मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास स्मशानभूमीतील कर्मचारी नकार देत आहे. अशा व्यक्तीचा मृतदेह दफन केल्यास त्याचीही आपल्याला लागण होईल, असे कारण ते देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 + sixteen =