चौफेर न्यूज – बेंगळुरू तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने पर्यावरणपूरक वीज जनरेटर बनविला असून तो इंधनाशिवाय चालतो. राज्यातील सर्व तुरुंगात हे जनरेटर बसविण्याचा प्रस्ताव त्याने दिला असून केंद्र सरकारनेही त्यात रस दाखविला आहे.

बेंगळुरू येथील पारप्पान अग्रहारा तुरुंगात आठ वर्षांचा तुरुंगवास भोगणाऱ्या देवेश कुमार सिंग याने हा जनरेटर तयार केला आहे. नोव्हेंबर 2012 मध्ये टाकण्यात आलेल्या एका बँक दरोड्याप्रकरणी त्याला शिक्षा झाली आहे. देवेश हा मध्य प्रदेशातील असून घटनेच्या वेळेस तो बेंगळुरू महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. दरोड्याच्या वेळेस एका ग्राहकावर गोळी झाडल्याबद्दल त्याला शिक्षा झाली आहे. देवेशने 28 डिसेंबर, 2017 रोजी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून आपला प्रस्ताव कळवला होता. तुरुंगात इंधन न वापरता आणि प्रदूषण न करता वीजनिर्मितीचा हा प्रस्ताव होता. या संदर्भात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून देवेश याला गुरुवारी पत्र मिळाले.

“आम्ही आपल्या कल्पनेची प्रशंसा करतो. तथापि, इंधनाशिवाय वीज कसे तयार होईल हे त्यात स्पष्ट नाही. आपल्या पत्राला प्रतिसाद देण्यासाठी या जनरेटरची कार्यप्रणाली, वापरलेले इंधन, तांत्रिक तपशील इत्यादी तपशील आवश्यक आहेत,” असे मंत्रालयाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty + nine =