चौफेर न्यूज – हिंदूंचे पवित्र स्थान असलेल्या कैलास मानस सरोवर यात्रा हजारो भाविक दरवर्षी करतात. कैलास मानस सरोवर हे तिबेट चायनाच्या ताब्यात आहे. ही तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांना चायना सरकार  जाणीव पुर्वक त्रास देते. ही तीर्थ यात्रा अतिशय कठीण असून एकुणच हवामान ही अनुकूल नसते. नेपाळच्या हद्दीतून ह्या यात्रेकरता मार्ग आहे. त्यावर खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत शुन्य काळाच्या प्रश्ना दरम्यान या प्रश्नाला वाचा फोडून सभागृहाचे लक्ष वेधले.

खासदार बारणे म्हणाले, भारतातून हजारोंच्या संख्येने तीर्थयात्री कैलास मानस सरोवरची यात्रा करतात. चायना सरकार ग्रुप व्हिसाच्या माध्यमातून प्रवेश देते. परंतू राजकीय संबंधीत व्यक्ती पदाधिकारी व पत्रकार यांना या यात्रेसाठी चायनाच्या परराष्ट्र विभागाकडून व्हिसा देण्यास टाळाटाळ केली जाते. जे तीर्थ यात्री नेपाळ मार्गे तिबेट चायनाच्या ईमिग्रेशन सेंटर वर जातात. त्या ठिकाणी पाच ते सहा तास जाणीवपूर्वक थांबवले जाते. या ईमिग्रेशन सेंटर च्या ठिकाणी शौचालय, पाणी या सारख्या सुविधा फक्त दाखविण्यासाठी ठेवल्या आहेत. तीर्थयात्रींचे जास्तीत जास्त हाल होईल, याची काळजी चायना सरकारच्या वतीने घेतली जाते. याचा अनुभव स्वतः ही यात्रा गेल्या जुन महिन्यात केल्याने मला आला असल्याचे बारणे म्हणाले.

केंद्र सरकारने कैलास मानस सरोवर यात्रा करणाऱ्या भाविकांच्या या प्रश्नाकडे लक्ष घालावे. यात्रीकरूंना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी सरकारने घ्यावी, अशी मागणी केल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 − thirteen =