चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका बीआरटीएस विभागाचे प्रवक्ता विजय भोजने यांच्या मातोश्री कै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी (दि. 10) सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत मोरवाडी येथील म्हाडा कॉलनीत एसएनबीपी शाळेमध्ये हे शिबिर होणार आहे. रक्तदात्यांनी (7387407825), (9922501768) या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करायची आहे. तसेच, आरोग्य तपासणीमध्ये रक्तदान सामान्य तपासणी, डोळे तपासणी, बालक आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तरी, गरजुंनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भोजने परिवाराकडून करण्यात आले आहे.

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी-चिंचवड, स्वराज्य ग्रुप, विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मैत्री बौध्द विहार, मनित मित्र मंडळ, म्हाडा सोसायटी, म्हाडा  मोरवाडी मित्र परिवार आणि दिपक भोजने आणि मित्र परिवारांची उपस्थिती राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 + 18 =