चौफेर न्यूज – वर्षातील पहिल्याच दिवशी, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १८ चेंडूत अर्धशतक झळकावणारा कॉलिन मुन्रो याने बुधवारी शतकांचा विश्वविक्रम केला. वेस्ट इंडिज विरुद्ध, न्यूझीलंडचा सलामीवीर मुन्रोने ५३ चेंडूंत माऊंट मौनांगीमध्ये १०४ धावा केल्या. त्यात १० षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय टी -२० सामन्यात मुन्रोचे हे तिसरे शतक आहे. त्याचबरोबर, क्रिकेटच्या या आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये ऐवढी शतके झळकावणारा तो पहिला खेळाडू आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ७ जानेवारी रोजी मुन्रोने याच मैदानावर पहिल्यांदा १०१ धावा केल्या होत्या. यानंतर त्याने भारतविरूद्ध नोव्हेंबरमध्ये राजकोट येथे १०९ धावा केल्या.

न्यूझीलंडने मुनोच्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजसमोर २४४ धावांचे आव्हान ठेवले होते. या विजयाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ १२४ धावाट गारद झाला. न्यूझीलंडने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-० ने जिंकली आणि ११९ धावांनी सामन्यात विजय मिळविला. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. न्यूझीलंडचा हा ११९ धावांनी विजय टी-२० मधील तिसरा सर्वात मोठा विजय आहे. सर्वात मोठा विजय मिळविण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावे आहे. श्रीलंकेने २००७मध्ये केनियाविरुद्ध १७२ धावांनी विजय मिळविला होता.

मुन्रोचे टी-२० मधील ३ आंतरराष्ट्रीय शतक

१. विरुध्द वेस्टइंडीज, १०४ धावा – मौनांगी, जानेवारी २०१८

२. विरुद्ध भारत, १०९ * धावा – राजकोट, नोव्हेंबर २०१७

३. विरुद्ध बांगलादेश, १०१ धावा – मौनांगी, जानेवारी २०१७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 − three =