शिरसोले : शिरसोले (ता. साक्री) येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकिय आश्रमशाळेच्या वैयक्तिक व सांघिक अ‍ॅथलेटिक्स विविध क्रिडा स्पर्धेत साक्री तालुक्यातील इंदवे येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. नाशिक येथे नोव्हेंबर मध्ये होणार्‍या विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी 15 विद्यार्थी व 5 संघ पात्र ठरले.
14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये गोविंद तुल्या पाडवी हा 100 मीटर, 400 मीटर शर्यत व गोळाफेक स्पर्धेत प्रथम तर मनिल पाडवी 600 मीटर शर्यतीत प्रथम आला. 14 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये मीना मोत्या वसावे ही लांब उडीत प्रथम व गोळाफेकीत द्वितीय आली.
17 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये दिनकर वळवी 1500 मीटर व अनिल वसावे 3 हजार मीटर शर्यतीत प्रथम तर विकास वळवी 800 मीटरमध्ये द्वितीय आला. 17 वर्षे वयोगटातील मुलीत उषा रायसिंग राहसे 400 मीटर व गोळाफेकीत द्वितीय तसेच पिंज्या राहसे ही लांब उडीत द्वितीय आली.
19 वर्षे वयोगट मुलात बटेसिंग वसावे हा 1500 मीटर, 3 हजार मीटर व 5 हजार मीटर या तिन्ही प्रकारात प्रथम, सुरेश सोनवणे 5 हजार मीटर धावण्यात द्वितीय व ईश्‍वर गेंद्रे लांब उडीत प्रथम आला. मुलींच्या 19 वर्षे वयोगटात रिना ओल्या वसावे ही गोळाफेकसह 100 मीटर व 800 मीटर धावण्यात प्रथम; तसेच मंगल हिरामण कामडे हीसुद्धा थाळीफेकसोबत 400 मीटर व 1500 मीटर शर्यतीत प्रथम आली. मनीषा काळू चौरे ही लांब उडीसह 3 हजार मीटर धावण्यात प्रथम आली. तर कविता सु-या वसावे ही 200 मीटर शर्यतीत
प्रथम आली.
वैयक्तिक क्रीडा प्रकारासोबतच सांघिक क्रीडा प्रकारातसुद्धा इंदवे आश्रमशाळेने यश मिळवले. 17 वर्षे वयोगटातील मुले 4 बाय 400 मीटर रिले शर्यत, 19 वर्षे वयोगटातून मुलांचा संघ हँडबॉल सामन्यात विजेता ठरण्यासह 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीतही विजेता झाला. तसेच याच वयोगटातून मुलींनीही 4 बाय 100 व 4 बाय 400 मीटर रिले शर्यत जिंकली.
एकूणच सर्वच अ‍ॅथलेटीक्स प्रकारात वरचढ ठरलेल्या इंदवे आश्रमशाळेच्या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सोनवणे, प्राचार्य प्रविण ठाकरे, मुख्याध्यापक गिरीश भामरे, व्यवस्थापक प्रविण सोनवणे यांनी कौतुक केले. मंगेश ठाकरे, भूषण सोनवणे, ज्योतीसिंग बागुल, रविंद्र सोनवणे, शिक्षिका प्रतिभा पाटील, रेश्मा कोकणी, लिना ठाकरे यांचे विजेत्यांना मार्गदर्शन लाभले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve + 13 =