चौफेर न्यूज ः खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 141 व्या तुकडीत निगडी, प्राधिकरणातील साहिल विजय बरजे याने राष्ट्रीय पातळीवर क्रमांक प्राप्त करून प्रवेश मिळविला. त्याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या वतीने सभापती ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
स्थायी समिती सभागृहात झालेल्या सत्कार समारंभाच्यावेळी ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, नगरसदस्य विलास मडिगेरी, राजू मिसाळ, अमित गावडे, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, विकास डोळस, नगरसदस्या गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, साधना मळेकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, नगरसचिव उल्हास जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 + 8 =