चौफेर न्यूज – आजपर्यंत आपल्या देशातील कोणत्याही पंतप्रधानाने पंतप्रधान कार्यालयाचा वापर करत विरोधकांवर टीका केलेली नाही. पण नरेंद्र मोदी हे रोज करत आहेत. पंतप्रधान पदाच्या व्यक्तीला इतक्या खालच्या स्तराला जाऊन टीका करणं शोभत नाही आणि हे देशासाठी चांगली गोष्ट नाही अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरलं. मोदी सरकारचं आर्थिक व्यवस्थापन सर्वसामान्य लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास हळूहळू कमी करत आहे. काही दिवसांपुर्वी अनेक राज्यांमध्ये निर्माण झालेला चलन तुटवडा नक्कीच रोखता येणं शक्य होतं असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

जीएसटीची अंमलबजावणी आणि नोटाबंदी ही मोदी सरकारची दोन मोठी आश्चर्य आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेच प्रचंड मोठं नुकसान झालं ज्याचा फटका छोट्या आणि मध्यम उद्योजकांना बसला आणि हजारो नोकऱ्याही गेल्या अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे.

यावेळी मनमोहन सिंग यांनी निरव मोदीचा उपस्थित करत सरकारला धारेवर धरलं. जिथपर्यंत निरव मोदीचा प्रश्न आहे, तेव्हा मला असं वाटतं की २०१५-१६ दरम्यान नक्कीच काहीतरी सुरु होतं. पण तरीही मोदी सरकारने काही केलं नाही. जर कोणाला दोष द्यायचाच असेल तर तो सरकारच्या भूमिकेला दिला पाहिजे असं मनमोहनि सिंग यांनी सांगितलं. तसं पहायला गेलं तर पंतप्रधान मोदी दावोसमध्ये निरव मोदीच्या सोबत होते. ज्यानंतर काही दिवसातच त्याने पळ काढला. यावरुनच हे सरकार किती निष्क्रिय आणि अजब आहे हे समजू शकतं असा टोला मनमोहन सिंग यांनी मारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four − three =