चौफेर न्यूज –  मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पुजन करून येथील जुनी हौसिंग सोसायटी म्हणुन प्रसिद्ध असलेल्या कुणाल रेसिडेन्सीमध्ये पेव्हींग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा आज शुभारंभ झाला. श्रीरंग बारणे यांनी खासदार निधीतून हे काम सुरू केले आहे.

आज सकाळी स्वतः खासदार बारणे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी रेसिडन्सीचे अध्यक्ष आत्माराम नाणेकर, प्रतिनिधी प्रविण पोतदार, गणेश धाकतोडे, आप्पा भणगे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. जेष्ठ पत्रकार अरूण कांबळे हेही या प्रसंगी उपस्थित होते.

सोसायटीतर्फे अध्यक्ष आत्माराम नाणेकर यांनी खासदार बारणे व मान्यवरांचे स्वागत केले. तर संजय बनसोडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen + 1 =