चौफेर न्यूज : प्रसिद्ध अभिनेते व भाजपचे विद्यमान खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा आगामी लोकसभेसाठी भाजपकडून पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना मैदानात उतरवले आहे. रविशंकर प्रसाद आता पटना साहिबमधून लढणार आहेत.

पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीत तीन राज्यातील भाजपच्या पराभवानंतर सिन्हा यांनी ट्विट करून टीका केली होती. “कही खुशी, कही गम, या पराभवाबाबत आपण आधीच इशारा दिला होता. कितीही कटू, कठोर असले तरीही सत्याचाच विजय होतो. निवडणूकीत विजयी झालेल्यांचे मनापासून अभिनंदन” असे ट्विट त्यांनी केले होते. तसेच कोलकात्याला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या भाजपविरोधी रॅलीला सिन्हानी उपस्थिती लावली होती. तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते. जोपर्यंत पंतप्रधान बोलणार नाहीत, तोपर्यंत ‘चौकीदार चोर है’ ही टीका ऐकून घ्यावीच लागेल, असं सिन्हा म्हणाले होते.

शत्रुघ्न सिन्हा यांनी २०१४ मध्ये पाटणा येथूनच भाजपसाठी लोकसभेची जागा जिंकली होती. मात्र, वेळोवेळी त्यांनी पंतप्रधान व भाजपविरोधी भूमिका घेतली त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद सोडावे लागले होते. पक्षावर खुलेआम टीका करत असतानाही पक्षाने त्यांच्यावर अद्याप कुठल्याही स्वरुपाची अधिकृत कारवाई केली नव्हती. मात्र, आता त्यांचे तिकीट कापले आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा काँग्रेस किंवा इतर पक्षात जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

बिहारमधील लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची यादी भाजप आणि जनता दल युनायटेडने प्रसिद्ध केली आहे. ४० उमेदवारांची नावे या दोन पक्षांनी जाहीर केली असून बिहारमध्ये भाजप आणि जनता दल युनायटेड प्रत्येकी १७ जागा लढणार आहे. रामविलास पासवान यांचा लोक जनशक्तीपक्ष ६ जागा लढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 1 =