पिंपरी चिंचवड ः बेडरूमच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी बंगल्यातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख 68 हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी पाचच्या सुमारास बावधन बुद्रुक येथे उघडकीस आली. श्रीकांत मुकुंदराव भट (वय 36, रा. उत्तमनगर, बावधन बुद्रुक, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत शनिवारी (दि. 11) कामानिमित्त परगावी गेले. दरम्यान, त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या बेडरूमच्या खिडकीचे गज कापून बंगल्यात प्रवेश केला. लाकडी कपाटाचे ड्रॉवरमधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण चार लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास श्रीकांत घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × five =