चौफेर न्यूज –  गंगानगर, प्राधिकरणमधील प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी गंगानगर विकास कृती समितीच्या शिष्ठमंडळाने प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांची भेट घेतली. यावेळी खाडे यांना निवेदन देण्यात आले असून प्रलंंबित प्रश्न सोडविण्यासाठी साकडे घालण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकपणाचे नवनियुक्त अध्यक्ष सदाशिव खाडे यांचा गंगानगर विकास कृती समितीतर्फे सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी सोशल मिडिया अध्यक्ष रणजित इंगळे, सुभाष निकम, पांडुरंग मोहिते, सोमनाथ सावंत, सुर्यकांत कर्डिले, हनुमंत जाधव काका, बाळू शेलार, अरविंद तावरे, राम नायडू, शिवाजी वाघमारे व अनेक नागरीक उपस्थित होते. या भेटी दरम्यान आलेल्या शिष्ठमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × four =