पिंपरी चिंचवड ः महापालिकेतील स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टुवार यांना सह शहर अभियंतापदी, प्रशासन अधिकारी श्रीनिवास दांगट, राजेश आगळे, सीताराम बहुरे, नगरसचिव उल्हास जगताप यांना सहाय्यक आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेत मंजुरी देण्यात आली. महापालिकेची मार्च महिन्याची तहकूब सभा गुरुवारी पार पडली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिका आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (स्थापत्य) देवन्ना गट्टुवार हे सेवा ज्येष्ठता यादीप्रमाणे प्रथम क्रमांकावर आहेत. त्यामुळे त्यांना सह शहर अभियंतापदी बढती देण्यात आली. त्याचबरोबर प्रशासन अधिकारी श्रीनिवास दांगट, राजेश आगळे, सीताराम बहुरे यांना सहाय्यक आयुक्तपदी बढती देण्यात आली. या प्रस्तावाला उपसूचना देत नगरसचिव उल्हास जगताप यांना देखील सहाय्यक आयुक्तपदी बढती देण्यात आली. याशिवाय उपअभियंता संध्या वाघ, शिवाजी चौरे, विलास देसले यांना कार्यकारी अभियंतापदी बढती देण्यात आली. या प्रस्तावाला उपसूचना देत उपअभियंता विजय भोजने यांना देखील कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान, हे बढत्यांचे सर्व ठराव सदस्य पारित आहेत. त्यामुळे त्याचे भवितव्य आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हाती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen − two =