साक्री – “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….” असा जयघोष करीत प्रचिती प्री प्रायमरी स्कूल, साक्री येथे अनंतचतुर्थीच्या दिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गेल्या दहा दिवसांपासून् विराजमान झालेल्या विघ्नहर्त्याला अखेरचा निरोप देण्यात आला. स्कूलचे चेअरमन श्री. प्रशांत भिमराव पाटील यांच्याहस्ते बाप्पाची आरती करण्यात आली. त्यानंतर, सत्यनारायणाचे पूजन सतीश बोरसे व मनिषा बोरसे यांच्या हस्ते झाले.

यावेळी स्कूलचे चेअरमन श्री. प्रशांत पाटील, शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे, प्रचिती पब्लिक स्कुलच्या प्राचार्या वैशाली लाडे,  व्यवस्थापक राहुल अहिरे, प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अतुल देव, व्यवस्थापक तुषार देवरे यांच्याहस मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, स्कूलच्या प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गणरायांना निरोप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी गणेशाच्या गितांवर ठेका धरला. वाजत गाजत मिरवणूक काढत शाळेचे अध्यक्ष श्री. प्रशांत पाटील यांच्याहस्ते गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. नदी घाटावर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर, या असा जयघोष करत गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणेश चतुर्थी निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी मोदक सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

गणेश चतुर्दशी निमीत्त शाळेत घेण्यात आलेल्या मोदक सजावट स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यामध्ये,

Class Nursery –

प्रथम क्रमांक : चैतन्य पवार

द्वितीय क्रमांक – सुधांशू काकरिया

तृतीय क्रमांक – भक्ती पाटील

उल्लेजनार्थ – शाहूराजे सावंत

Class L.K.G. Diamond –

प्रथम क्रमांक – सौम्या ठाकरे

द्वितीय क्रमांक – चारवी बेडसे, शौर्या सोनवणे

तृतीय क्रमाक : परिनिती गांगुर्डे.

Class L.K.G. Gold –

प्रथम – गौरवी सोनवणे

द्वितीय क्रमांक – उन्नती डिसुजा

तृतीय क्रमांक – प्रमोद मोरे

उत्तेजनार्थ – हेमराज अहिरे

Class U.K.G. Rose –

प्रथम क्रमांक : निहारिका बोरसे

द्वितीय क्रमांक – अवनी साबळे

तृतीय क्रमांक – हेमांगी पाटील

Class U.K.O. Lotus –

प्रथम – युक्ता देसले

द्वितीय क्रमांक – अनया पानपाटील, रिद्धी सोनवणे.

तृतीय क्रमांक – तन्मय देवरे.

उत्तेजनार्थ – चैतन्य देसले.­

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven − 3 =