पिंपळनेर – प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथील गणपती बाप्पाला सातव्या दिवशी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणांसह स्कूलच्या शिक्षकांनी गणरायाचा शनिवारी निरोप घेतला. येथील लाटीपाडा धरणात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

तत्पूर्वी, सचिन देसले आणि अर्चना देसले यांच्याहस्ते सत्यनारायणाचे पूजन झाले. प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक राहुल पाटील यांच्या नियंत्रणाखाली कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी, प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अतुल देव, समन्वयक तुषार देवरे, प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या भारती पंजाबी, समन्वयक वैभव सोनवणे यांच्यासह शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, गणेश उत्सव निमीत्त गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गणेश उत्सवानिमीत्त विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला. महाप्रसादानंतर वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. यावेळी गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी कुणी बाप्पासोबत फोटो काढले तर कुणी सेल्फी घेतली. गणपती विसर्जना दरम्यान ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार’, ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांच्या गजरात गणपती बाप्पाला विसर्जन स्थळी नेऊन भावपूर्ण निरोप दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − 13 =