चौफेर न्यूज  – “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” असा जयघोष करत ढोलताशांच्या गजरात गणेश विसर्जनासाठी निघालेल्या गणेश मंडळाचे स्वागत महापालिकेच्या वतीने महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

गणेश विसर्जनासाठी  चिंचवड गांव येथील चापेकर चौकात आणि पिंपरी येथील कराची चौकात महापालिकेच्या वतीने मदत कक्ष उभारण्यात आले होते. याठिकाणी गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे तसेच ढोललेझीम पथकांच्या प्रमुखांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी चापेकर चौक, चिंचवड गांव येथे महापौर राहूलजाधव,उपमहापौर सचिन चिंचवडे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, ब प्रभाग अध्यक्ष करुणा चिंचवडे,नगरसदस्य राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, नामदेव ढाके,शीतल शिंदे,नगरसदस्याअपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे,अॅड. मोरेश्वर शेडगे स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी आदींनी मंडळांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे,अतिरिक्त आयुक्त दिलीपगावडे,क्षेत्रियअधिकारी संदिप खोत, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, ब प्रभागाचे पंढरीनाथ गुंडाळ,इत्यादी अधिकारी उपस्थित होते. तर कराची चौक,पिंपरी येथे ही महापौर राहूल जाधव, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी राजेश जगताप आदिंनी मंडळांचे स्वागत केले.

कराची चौक, पिंपरी येथेसुमारे ५६ गणेश मंडळांचे तर चापेकर चौक, चिंचवड येथेसुमारे ५७गणेश मंडळांचे महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. पिंपरी व चिंचवड येथील घाटावर विसर्जन हौद, निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कुंड, अग्निशमन वाहन, फिरत्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. घाटावर अग्निशमन दलाचे जवान तसेच जिवरक्षक, सुरक्षा रक्षक, आरोग्य कर्मचारी तसेचभारतीय जैन संघटना संत तुकारामनगर, नव महाराष्ट्र महाविद्यालय पिंपरी, डी वाय पाटील कॉलेज, लायन्स क्लब पिंपरी या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.त्याचप्रमाणे प्रथमोपचार केंद्र व वैद्यकीय पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. घाटांच्या परीसराची स्वच्छता ठेवण्यासाठी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती. या व अशा प्रकारच्या इतर सर्व सुविधा महापालिकेमार्फत देण्यात आल्या.

पुष्पांचा वर्षाव करून मोठ्या हर्षोउल्हासात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या,अशा घोषात गणेश विसर्जन करण्यात आले. नागरिकांनी उत्साह व भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 + 13 =