चौफेर न्यूज – गारपीट आणि वादळी वार्‍याने मराठवाड्यासह विदर्भात शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले असून राज्य सरकारने या नुकसानीपोटी एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत अतिशय तुटपुंजी असून, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली शासनाने २०१४ प्रमाणे विशेष पॅकेज देऊन कोरडवाहुसाठी हेक्टरी २५ हजार, बागायतीसाठी ४० हजार, तर फळबागांसाठी ५० हजार रुपयांची मदत करण्याची मागणी आहे.

सुमारे २ लाख हेक्टरवरील पीके, फळबागांचे मराठवाडा व विदर्भात झालेल्या गारपीट, वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मुंडे यांनी या नुकसानीची काही ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे जाहीर केले. पण धनंजय मुंडे यांनी या मदतीवर आक्षेप घेतला आहे.
मुंडे म्हणाले, अशाच प्रकारचे नैसर्गिक संकट २०१४ मध्येही शेतकर्‍यांवर आले होते. शेतकर्‍यांना प्रचलित मदतीसोबतच विशेष पॅकेज तेव्हाच्या आघाडी सरकारने दिले होते. आताच्या सरकारने त्याच धर्तीवर आपतग्रस्त शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली. त्याचबरोबर २०१४ मध्ये २०० कोटी रुपयांचे विजबील माफ केले होते. जवळपास २६५ कोटी रुपयांचे कर्जावरील व्याज माफ केले होते, पीक कर्ज वसुलीस मुदतवाढ व सक्तीने कर्जवसुली करू नये, असे आदेश दिले होते. याची आठवण करुन देतानाच त्यावेळचा २० मार्च २०१४ चा शासन निर्णयही मुंडे यांनी ट्विट करुन शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × four =