चौफेर न्यूज –विदर्भ, मराठवाड्यात झालेल्या गारपीटीमुळे ४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांना तात्काळ आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर खोत यांनी गारपीटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही दिले आहेत. विमा कंपन्यांना या नुकसानीबाबत लेखी कळवण्यात येणार असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे.

दरम्यान रविवारी मराठवाड्यातील जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यातील काही तालुके आणि गावांना अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. यात सर्वाधिक नुकसान जालना जिल्ह्यात झाले आहे. या जिल्ह्यात सकाळीच झालेल्या गारपिटीत शेतात काम करण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. जालना पाठोपाठ बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील काही गावे गारांच्या तडाख्यात सापडली. गारपिटीने रब्बी ज्वारी, हरभरा, गहू आदी रब्बी पिकांसह द्राक्ष, संत्रा आणि मोसंबीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 3 =