चौफेर न्यूज –  नाशिक जिल्ह्यात विविध गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या चिंचवड पोलीसांनी आवळल्या आहेत. चेतन रामलाल कुशवाह (वय २८) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून दोन गावठी कट्टे आणि काडतूसासह चिंचवड पोलीसांनी आज अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकाचे सहा पोलिस निरीक्षक अभिजीत जाधव व कर्मचारी हे पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की, नाशिक जिल्ह्यातून २ गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी चेतन रामलाल कुशवाह वय २८ रा. इंद्रायणी नगर, भोसरी हा चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीसांनी तात्काळ सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता दोन गावठी पिस्टल व ३ काडतूसे मिळून आली. सदर आरोपी हा खालील २ गुन्ह्यात फरार होता. तसेच दोन महिने पुणे जिल्ह्यातून या आरोपीस तडीपार केले होते.

सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त परि-१ स्मार्तना पाटील, सहा पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग सतिश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस हवालदार पांडुरंग जगताप, पो.ना.स्वप्निल शेलार, विजयकुमार आखाडे, राजेंद्र सिरसाठ,पो.शि. गोविंद डोके, पंकज भदाने, अमेाल माने, मपोना वंदना गायकवाड यांनी कामगिरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − 12 =