चौफेर न्यूज –   गुरुपौर्णिमा तसेच शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहननगर काळभोरनगर  परिसरातील ३० शिक्षकांचा एकाच वेळी सन्मान करण्यात आला. शिवसेना शाखा मोहननगर तसेच नगरसेविका मीनल यादव, विभागप्रमुख नाना काळभोर, विशाल यादव मित्र परिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यामध्ये मोहननगरमधील क्रांती ज्योती शाळेचे प्राध्यापक श्री.व सौ.निंबाळकर सर, प्रतिभा कॉलेजच्या सौ.गांधी, सरस्वती विद्यालयाच्या सौ.दाभाडे मॅडम, मोहननगरचे प्रसिद्ध शिक्षक दादा नवकुडकर, श्री.सतीश मेहेर, पॉल मॅडम, आकुर्डी उर्दू शाळेच्या मोमीन मॅडम, कांतीलाल खिवसरा शाळेच्या प्राध्यापिका विनया जोशी मॅडम, तसेच काळभोरनगर महापालिका शाळेच्या प्राध्यापिका पाटील मॅडम, शिंदे सर असे अनेक मान्यवर गुरूवर्य यावेळी उपस्थित होते. त्यानंतर हॅन्डीकॅप सेंटर व अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी फळवाटप करण्यात आले.

आयुष्यभर आपण विद्यार्थीच असतो व प्रत्येक  दिवस नवीन शिक्षण  मिळत असते त्यामुळे त्याला मार्गदर्शन करणारा  गुरू हाच सर्वश्रेष्ठ असतो असे गौरव उद्गार यावेळी शिवसेना महिला संघटिका सुलभा उबाळे यांनी केले. यावेळी शिवसेना गटनेते राहुल कालाटे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेविका शारदा बाबर, माजी नगरसेविका विमल जाधव, शहर संघटक रोमी संधू, कुणाल जगनाडे, सुशीला पवार, संतोष   सौदनकर, अनिता तुतारे आदी ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − 2 =