पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये “पिंक डे” साजरा

चौफेर न्यूज –  पिंपळनरे येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवार दि. ३० नोव्हेंबर रोजी पिंक डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात चिमुकल्यांनी गुलाबी रंगाचे ड्रेस परिधान करून रंगत आणली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या वैशाली लाडे होत्या. यावेळी समन्वयक राहुल अहिरे उपस्थित होते.  दरम्यान, फलक लेखनातून चिमुकल्यांना “पिंक डे” च्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, पिंक रंगाचे फुले व पिंक मिनीचे चित्र रेखाटण्यात आले.  या कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती.  कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली.  कृषाली भदाणे यांनी गुलाबी रंग प्रेमाचे व सौंदर्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो, अशी माहिती दिली. तर, प्राचार्या वैशाली लाडे यांनी गुलाबी रंग हा दुय्यम रंग असल्याचे सांगितले. दरम्यान, “पिंक डे” निमित्ताने ‘इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा’ घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − two =