पिंपरी चिंचवड ः  एकाच रात्रीत चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरी केली. त्यामध्ये एक मोटारही चोरून नेली. ही घटना बावधन येथे नुकतीच उघडकीस आली.
सूर्यकांत छगनभाई गोहेल (वय-62, रा. चंद्रनील अपार्टमेंट, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 31 ऑक्टोबर रोजी गोहेल राहत असलेल्या इमारतीमध्ये मध्यरात्री अडीच वाजता चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांनी गोहेल यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील सेंट्रो मोटारीची चावी चोरली. त्यानंतर पार्किंगमधील त्यांची सव्वा लाख रुपये किंमतीची मोटार चोरून नेली. तसेच याच सोसायटीतील योगेश विजयसिंह राजपूत यांच्या घरातील मौल्यवान तसेच दीपक हेगडे यांच्या घरी देखील चोरी केली. सहायक निरीक्षक आनंद पगारे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − twelve =