चाकण म्हाळुंगे गावच्या हद्दीतील कुणाल लॉजींग अॅन्ड बोर्डींगमध्ये सरासपणे सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात चाकण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून २२ आणि २८ वर्षाच्या दोन परराज्यातील तरुणींची सुटका केली आहे.

तसेच या दोन तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या सौरब रवींद्र सांगळे (वय २३, रा. राणुबाई मळा, मुळ रा. बार्शी जि. सोलापुर) आणि त्याचा साथीदार अप्पा चुंगे (रा. राणुबाई मळा) या दोघांविरोधात पीटा अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण म्हाळुंगे गावच्या हद्दीतील कुणाल लॉजींग अॅन्ड बोर्डींगमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी सोमवारी (दि.२२) रात्री पावणेबाराच्या सुमारास कुणाल लॉजवर सापळा रचून धाड टाकली. यावेळी तेथे कोलकाता येथील २२ आणि २८ वर्षाच्या दोन तरुणी आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता आरोपी सौरब आणि अप्पा हे दोघे त्यांच्याकडून दिड हजार रुपयात वेश्यागमन करुन घेत असल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी त्या दोघींची सुटका करुन आरोपी सौरब आणि अप्पा या दोघांवर पीटा अॅक्ट अंतर्गत कारवाई केली आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − seven =