चौफेर न्यूज – जुलै महिन्यात चाकण येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी ११ आंदोलकांना अटक केली आहे. या हिंसाचाराप्रकरण यापूर्वी ३० जणांना अटक झाली होती. त्यामुळे अटक झालेल्या आंदोलकांचा एकूण आकडा आता ४१ वर पोहोचला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चाकण येथे ३० जुलैरोजी हिंसाचार झाला होता. सुमारे ४ ते ५ हजार जणांवर सामूहिक गु्न्हा दाखल करण्यात आला होता. आंदोलकांनी येथे वाहनांची तोडफोड करीत जाळपोळही केली होती. यामध्ये ३० बस जाळण्यात आल्या होत्या. सार्वजनिक मालमत्तेचे इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने पोलिसांकडून हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गल घडवणे, जमाव जमवणे, पोलिसांवर हल्ला करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा यात समावेश होता.

तळेगाव चौक हा भाग त्यावेळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत होता पुणे ग्रामीण पोलिसांनी आधी ३० आंदोलकांना अटक केली होती. आता हा भाग नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. या पथकाने आता कारवाईचे सत्र सुरू करत अकरा आंदोलकांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + 18 =