चिंचवड ः रिक्षा पार्कींगच्या वादातून एका रिक्षाचालकाने दुसर्‍या रिक्षाचालकावर कोयता आणि तलवारीने वार करुन जखमी केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास चिंचवड आनंदनगर येथील नरेश सुपर मार्केट समोर घडली. संजय तायप्पा दावनोळ (वय 32, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजय सुरेश कांबळे (वय 30, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय आणि आरोपी अजय हे दोघे एकाच परिसरात राहत असून दोघेही रिक्षाचालक आहेत. शनिवारी रात्री रिक्षा पार्कींगच्या वादातून दोघांमध्ये भांडण झाले. यादरम्यान आरोपी अजय याने कोयता आणि तलवारीने संजय याच्या डोक्यावर तसेच हातावर वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × three =