कामगा व्यवस्थापनाच्या विरोधात

चौफेर न्यूज – चिंचवड येथील प्रिमियर कंपनीतील कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात अनंत अडचणी आल्यानंतर कंपनी 1 मार्चपासून चाकणला स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत कामगार संघटनेशी कंपनी व्यावस्थापनाने कसलीही चर्चा केली नसल्याचे संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले आहे.

कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांचे वेतन देत नाही. मुद्दाम सहा महिने, आठ महिने तर कधी वर्षभर वेतन दिले जात नाही. कामगारांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. कंपनीची आर्थिक स्थिती भक्‍कम असतानाही वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले जात नाही. वेतन न मिळाल्याने, आर्थिक विवंचनेत कामगार सापडला आहे. कामगाराची परिस्थिती नाजूक असून दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. अनेकांचे कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची फी भरणे अवघड झाले आहे.

कामगारांना आर्थिक विवंचनेत टाकून कंपनी व्यवस्थापन अन्यायकारक भूमिका घेत आहे. कंपनीच्या कामगारांची पिळवणूक प्रिमियर कंपनीचे व्यवस्थापन करीत असल्याचा आरोप कंपनीतील कामगार संघटनेने केला आहे. कामगारांच्या परिश्रमातून उभारलेल्या कंपनीतील कामगारांच्या कुटुंबाला रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

 

कंपनी व्यावस्थापनाच्या अन्यायकारी भूमिकेच्या विरोधात कामगारांनी गेल्या वर्षी 54 दिवसांचे आंदोलन केले. तरीही, व्यवस्थापनाने त्याची दाखल घेतली नाही. कंपनीत अनेक कामगारांचे कुटुंब बेकारीस आले आहे. कामगारांचे पीएफ, पगार गेल्या दोन महिन्यांपासून थकलेले आहे.

अध्यक्ष आशिष शिंदे, प्रिमियर कामगार संघटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × five =