चौफेर न्यूज –  जागतिक योग दिनानिमित्त चिंचवड स्टेशन उद्योगनगर येथील क्वीन्स टाऊन सोसायटी मध्ये योगासने व सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. त्यात २०० हुन अधिक रहिवाशी नागरिकांनी सहभाग घेतला.

यावेळी संजना गारगोटे यांनी योगासनाचे विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. देविदास कुलथे, राजेंद्र केंदे यांनी सहकार्य केले. अनुपमा प्रभुणे व सरनोबत यांनी उपस्थितांना योगासनांचे फायदे व योग करण्याची शास्त्रोक्त पद्धत याबद्दल मार्गदर्शन कले. सुजित पाटील व शिरीष पोरेड्डी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.
 योग दिनाचे औचित्य साधून नुकतेच हिमालयात यशस्वी ट्रेकिंग केल्याबद्दल सोसायटीमधील संस्कार सोशल फाऊंडेशनचे  बाळकृष्ण खंडागळे, महानगरपालिकेचे अभियंता शिरीष पोरेड्डी, रवींद्र सोनावणे, तुषार देशपांडे, सुरेश गारगोटे, सचिन देशमुख, राजेश कर्णावट, आत्माराम गोरे, विजेंद्र बन्सल, शिवासर्वानन शेषाद्री, शिवप्रसाद ढाकणे, मंगेश कोल्हे या गिर्यारोहकांचा  सन्मान करण्यात आला.  ट्रेकिंग ग्रुपतर्फे १०० गरीब व अनाथ मुलांसाठी वह्या व पेन यतिश भट यांच्याकडे देण्यात आले. तसेच ६०० किमी अखंड सायकलिंग करणे पोहणे व धावणे यात विशेष नैपुण्य मिळवल्याबद्दल विश्वकांत उपाध्याय यांचाही सन्मान करण्यात आला.
 कार्यक्रमाचा समारोप पसायदान घेऊन करण्यात आला. डॉ. राजीव पटवर्धन यांनी उपस्थितांचे आभार मानले . प्रा. सदानंद बोगमी यांनी सूत्रसंचालन केले. योग गुरु कै. हेमलता लड्ढा यांना यावेळी श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − 7 =