चौफेर न्यूज  ः स्वामी विवेकानंद यांच्या 156 व्या जयंतीनिमित्त श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ पिंपरी, आणि जनसेवा फाउंडेशन आय हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. चिंचवड येथील मयूर हॉस्पिटल, महात्मा फुलेनगरला शनिवार (दि.12) रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या वेळेत हे शिबिर होईल. या शिबिरात चाळीस वर्षे वयोगटावरील स्त्री-पुरुषांसाठी नेत्र तपासणी, चाळिशीचा चष्मा वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच लेन्स (भिंग) बसवले जाणार असून या सर्व सुविधा मोफत आहेत. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे यांच्याशी 9850811887 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × four =