पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कृष्णानगर चिखली, साने चौक, भाजी मंडई व मच्छी मार्केट या परिसरात सोमवारी (दि. 20) रोजी कारवाई केली. कारवाईत वाहतुकीस अडथळा करणारे 6 हातगाड्या, 10 टपर्‍या, 12 काउंटर व विक्रीचे साहित्य जप्त केले.

जप्त केलेले साहित्य नेहरूनगर, पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील गोदामात जमा करण्यात आले आहे. कारवाईसाठी 1 कनिष्ठ अभियंता, 3 बिट निरीक्षक, अतिक्रमण पथकाचे कर्मचारी व पोलिस उपस्थित होते. कारवाईसाठी 1 क्रेन, 4 डंपर व 6 मजुरांचे सहाय्य घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 + three =