चौफेर न्यूज मित्रास भेटण्याकरीता पायी चाललेल्या तरुणास दोन चोरट्यांनी मारहाण करुण त्याच्याकडील  20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व रोख 2 हजार रुपये असा एकुन  22 हजार रुपयांचा ऐवज व महत्वाची कागदपत्रे घेऊन पळ काढला. ही घटना खडकी रेल्वे स्थानका मागील सेंट थॉंमस चर्च मार्गावर सोमवारी  रात्री पावणेनऊ वाजता घडली. घटना घडल्या नंतर अवघ्या दोन तासातच खडकी पोलिसांनी या घटनेतील एका आरोपीस जेरबंद केले.                                              दिनेश प्रल्हाद कांबळे (वय-19, रा.गोपी चाळ बोपोडी )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेतील त्याचा सहकारी मात्र फरार आहे. शैलेश विजयकुमार रुईकर (वय -22 रा. चिंचवड गांव) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

रुईकर हे त्याच्या कंपणीत कामास असलेला मित्र संदीप कराळे (रा.माऊंट वर्ड सोसायटी चिखलवाडी रोड खडकी) यास भेटण्यासाठी सेंट थॉंमस चर्च मार्गाने जात असताना पाठीमागुन दोन अनोळखी मुले आली. त्यांना जाणुन बुजुन धक्का मारुण शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. रुईकर यांच्याकडील 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व खिशातील  रोख दोन हजार रुपये व महत्वाची कागदपत्रे होती असा एकुन  22 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला.

रुईकर यांनी तत्काळ पोलिस स्टेशनला धाव घेत तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक लक्ष्मण बोराटे यांनी पोलिस उप निरीक्षक मदन कांबळे, पोलिस हवलदार जे. एस. मोमिन, बिट मार्शलचा पोलिस कर्मचारी स्वप्निल घोलप, एम.जे.गोपनर यांना घटना स्थळी जाऊन आरोपींची माहीती घेण्याचे आदेश दिले.

पोलिस पथक घटनास्थळी आले त्यांनी चौकशी व तपासा अंतर्गत आरोपींची माहिती घेत चिखलवाडी येथिल हॉंकी मैदान परीसरात आरोपींचा शोध घेत असताना दोघे संशयीत बसलेले दिसुन आले. पोलिसांना पाहुन त्यातील एकाने पळ काढला तर एकास पोलिसांनी पकडले .त्याच्याकडे तपास केला असता सदर घटनेतील आरोपी आसल्याचे सिद्ध झाले. कांबळे नावाच्या या आरोपी कडे चोरुन नेलेला मोबाईल व पाकीट त्यातील रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रे मिळुन आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × three =