चौफेर न्यूज – आता भारतामध्ये ब्रिटनमधील प्रसिद्ध कंपनी स्कोमादी पाऊल ठेवणार असून आपली टू-व्हीलर स्कूटी स्कोमादी भारतात लाँच करणार आहे. ही कंपनी लम्ब्रेटा जीपी स्टाईल मॉडल बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध असून ही कंपनी टीएल २००, टीएल२००i, टीएल५०, टीएल१२५ आणि टीटी१२५ या स्कूटींचे उत्पादन करत आहे. पुण्यातील एजे डिस्टीब्यूटर्ससोबत कंपनीने करार केला असून कंपनी त्यांच्यासोबत स्कूटीची विक्री करणार आहे. सध्या भारतात टीटी१२५ स्कूटीची विक्री केली जाणार आहे. जगातील सर्वात महागडी स्कूटी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. २ लाख रुपये एवढी या स्कूटीची किंमत आहे.

वर्षाभरापूर्वी येणाऱ्या लेम्ब्रेटा स्कूटी सारखे स्कूटीचे डिझाईन आहे. मॉडर्न लूकसह एलईडी हेडलाईट आणि टेललाईट स्कूटीला देण्यात आले आहेत. डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. यामध्ये १२ इंचाची अॅलॉय व्हीलसोबतच ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. १०० किलो वजनाच्या या स्कूटीमध्ये ११ लीटरची पेट्रोलची टाकी देण्यात आली आहे. अप्रिलियाचे १२५सीसीचे इंजिन टीटी१२५ मध्ये असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − thirteen =