चौफेर न्यूज –  समाजासाठी काहीतरी करणारांचाच गौरव होतो, असे प्रतिपादन महापौर राहुल जाधव यांनी येथे केले.   थेरगाव येथील जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कर्तृत्व गौरव पुरस्कार सोहळ्यात नंदकुमार सातुर्डेकर (ज्येष्ठ पत्रकार), अश्विनी चिंचवडे, माया बारणे, करुणा चिंचवडे (नगरसेविका), जयश्री येवले (कीर्तनकार), प्रदीप वाल्हेकर (अध्यक्ष रोटरी क्लब), प्रकाश काचळे (उद्योजक), नवनीत गांधी (ज्योतिष मार्गदर्शक) थेरगाव सोशल फाऊंडेशन, श्री फाऊंडेशन यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी महापौर जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंग बारणे होते.

या कार्यक्रमास माजी उपमहापौर नगरसेविका झामाताई बारणे, शेकापचे शहराध्यक्ष नितीन बनसोडे, प्रतिष्ठानचे संस्थापक हरिष मोरे, अध्यक्ष दीपक पारखी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, प्रपंचाचा गाडा चालवत असताना समाजाप्रती चांगले काम करणारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर एक सिद्धहस्त लेखणी असलेला निर्भीड पत्रकार आहे. त्याची  अनेकांशी मैत्री असली तरी तो लिहिताना कोणाचाच मुलाहिजा ठेवत नाही. त्यांच्यासारख्या पत्रकारांचा आदर्श सर्वांनीच घेतला पाहिजे.

माया बारणे म्हणाल्या की, नगरसेवकांनी आपल्या भागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन काम केले पाहिजे. पत्रकार सातुर्डेकर म्हणाले की, तत्वांशी बांधिलकी ठेवत जेव्हा आपण संघर्षमयी जीवन जगतो तेव्हा आत्मविश्वासाने, ताठ मानेने, स्वाभिमानाने जगण्यात असलेला आनंद आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. गेली ३२ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करताना मी हाच आनंद मिळवला असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five + four =