पिंपरी : जागतिक डेंग्यू दिनानिमित्त प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहचविण्याची मोहीम महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने हाती घेतली आहे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. आठवड्यातून एकदा घरात पाणी साठवण्याची भांडी स्वच्छ व कोरडी करून पाणी पुन्हा दोन पदरी फडक्याने गाळून भरावे. घरातील फ्लॉवर पॉट, कुलर व फ्रिजचा खालचा ट्रे मधील पाणी दर आठवड्यास रिकामी करायचे आहे. घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावायची आहे. परिसरात, घराजवळ पाण्याची डबकी असल्यास ती बुजवावित. आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जागरूक रहावे. ताप आलेल्या रुग्णास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध देऊ नये, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine − seven =