साक्री – येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये दि. २१ जून शुक्रवार रोजी विद्यार्थी जिवनात व्यायामाचे फायदे कळावे, यासाठी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच, “योग पळवितो रोग”, हा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या भारती पंजाबी होत्या. तसेच, शाळेचे व्यवस्थापक वैभव सोनवणे यावेळी उपस्थित होते. जागतिक योग दिनानिमीत्त सर्व विद्यार्थी- शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांनी पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करून योगाचे प्रकार सादर केले. तसेच, विद्यार्थ्यांनी हेल्थी फुडचा आनंद घेतला.

यामध्ये, नर्सरीतील चिमुकल्यांनी – ॲपल, एल.के.जी. – उसळ (मटकी, मुग, चवळी). यु.के.जी. – सलाड चा आस्वाद घेतला. यातून Eat Healthy, stay Healthy हा संदेश देण्यात आला. “Healthy is Wealth” “Do exercise everyday” शाळेतील शिक्षीका पुनम पवार यांनी विविध प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना व्यायामाचे व पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून दिले. यासह जॅक फुड खाल्याने आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम त्यांनी सहज आणि सोप्या भाषेत मुलांना सांगितले.

तसेच, शाळेतील शिक्षिका मनिषा बोरसे यांनी कवायतीचे प्रकार विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. युकेजीतील विद्यार्थ्यांना सुर्य नमस्काराचे प्रकार सांगितले. विद्यार्थ्यांनी देखील उत्कृष्ठ प्रकारे योगाचे सादरीकरण केले. योग दिनाची माहिती वृषाली सोनवणे यांनी सांगितली. त्या म्हणाल्या, २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सूरूवात २१ जून २०१५ रोजी झाली. प्रसंगी, शाळेच्या आवारात विविध प्रकारचे आकार रेखाटून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जम्पींग, रनिंग, डान्सींग, लायटींग असे कवायतीचे प्रकार सादर करून मनोरंजनातून “प्ले विथ लर्न” असा उपक्रम राबविला. यावेळी, सुनिता पाटील यांनी वेगवेगळ्या वेशभुषेद्वारे दैनंदिन जीवनातील चांगल्या व पौष्टीक आहाराचे संदेश दिले.

धैर्या शेवाळे – सॅलड, अशिता शर्मा – ॲपल, देवेश गवळे – कंगवा, अन्वी जैन – डेटॉल हॅन्डवॉश, निरल कांकरिया – टूथपेस्ट, प्रथम सोनवणे – रामदेव बाबा या विद्यार्थ्यांनी भूमिका साकारल्या. या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षीका श्वेता रौदंळ, पुनम पवार, वृषाली सोनवणे, सुनिता पाटील, प्रिती लाडे, हिरल सोनवणे, मनिषा बोरसे, ज्योती नांद्रे, करिष्मा देसले, तसेच शिक्षकेतर कर्मचारी जयश्री नांद्रे, बंदिश खैरनार, दिपक अहिरे, शांताराम पगारे, वैशाली भामरे, मंगल पवार, ललिता पवार यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे चेअरमन श्री. प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जागतिक योग दिवस या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुनम पवार यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − 3 =