चौफेर न्यूज – स्टार आर्चर्स अकॅडमीतर्फे जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण ५० हुन अधिक शाळेतील १५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. इ १ली ते १२ वी च्या खेळाडूंसाठी विविध गटात स्पर्धा घेण्यात आल्या.

यावेळी महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर, प्राचार्या अमृता वोरा, रेश्मा शेख, पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष मंत्री उपस्थित होते. अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून जास्तीत जास्त खेळाडूंना सहभाग मिळून राष्ट्रीय – आंतरराष्टीय खेळाडू निर्माण करता येतील. तसेच पिंपरी चिंचवड शहरात धनुर्विद्या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यात मदत होईल, असे मत स्टार आर्चर्स अकॅडमीच्या संचालिका व आंतरराष्टीय पदक विजेत्या सोनल बुंदेले यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + 18 =