चौफेर न्यूज

वस्तू व सेवा कर (जीएसटी) GST १ जुलैपासून लागू होणार आहे. त्याची घोषणा शुक्रवारी म्हणजेच आज मध्यरात्री संसदेत आयोजित केलेल्या विशेष सोहळ्यात केली जाणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सोहळ्याला उपस्थित असतील.

जीएसटी लागू झाल्यास एक देश, एक कर व्यवस्था प्रत्यक्षात येईल, असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. जीएसटीनुसार अन्नधान्य, दूध, अंडी आणि मीठ आदींसह अनेक जीवनावश्यक वस्तूंवर कर लागणार नाही. पण बँकींग आणि वित्तीय सेवा महाग होतील. जीएसटी लागू झाल्यानं अनेक वस्तू स्वस्त होतील तर अनेक वस्तू महागणार आहेत. जीएसटीमुळे हॉटेलिंग महागणार आहे. रेस्तराँमध्ये जेवण करण्यासाठी खिशाला चाट बसणार आहे. नॉन-एसी रेस्तराँमध्ये बिलावर १२ टक्के कर, एसी रेस्तराँ आणि दारु पिण्याचा परवाना असलेल्या रेस्तराँमध्ये १८ टक्के कर, तर पंचतारांकीत हॉटेलातील बिलावर २८ टक्के कर लागणार आहे. त्यामुळे हॉटेलातील जेवण महाग पडणार आहे. मोबाईल फोन महागणार आहेत. मोबाईल बिलही महागणार आहे. क्रेडिट कार्ड पेमेंटही महागणार आहे. सोने खरेदीही महागणार आहे. तर पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि मद्य जीएसटीतून वगळण्यात आले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर आणि मद्यावर जीएसटीचा काहीही परिणाम होणार नाही. म्हणजे ज्या किंमती आहेत, त्या कायम राहतील.

या वस्तू आणि सेवा होणार स्वस्त –

केशतेल, साबण, टूथपेस्ट, झाडू, मेणबत्ती, बिस्किटे, चॉकलेट, मिठाई, चहा-कॉफी, साखर, टीव्ही, वॉशिंग मशिन, स्मार्टफोन, अॅल्युमिनियमची भांडी, तांब्याची भांडी

खते, सिनेमा-नाटकाची तिकिटे, हॉटेलमधील खाणे, दुचाकी, आलिशान कार,

प्राथमिक कार फर्निचर, खासगी टॅक्सी सेवा, दूध, धान्ये, भाज्या, फळे

या वस्तू महागणार !

मोबाइल बिल, वाय-फाय सेवा, डीटीएच सेवा, कुरियर सेवा, आयुर्विमा पॉलिसी,

बँकिंग सेवा, गुंतवणूक व्यवस्थापन सेवा, तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग,

घरभाडे, आरोग्यसेवा, शाळेची फी, मेट्रोचा प्रवास, पेये, शाम्पू, अत्तरे,

सोने, सिगारेट, पान मसाला, बटर, चीज, सुकामेवा, रेझर, मनगटी घड्याळ,

व्हिडिओ गेम्स, स्टोव्ह, इलेक्ट्रिक हॉट प्लेट, वॉल पेपर, प्लास्टर

टायर, प्लास्टिक वस्तू आदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 1 =