चौफेर न्यूज – केंद्र सरकारने सेवा व वस्तू कर (जीएसटी) लागु करून एक धाडसी निर्णय घेतला आहे. जीएसटीच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीत १८ लाख करोड जमा झालेत. करदात्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जीएसटीच्या कर माध्यमातून जगात आपल्या देशाची प्रतिमा उंचावणार आहे. असा सुर तज्ञ मान्यावरांनी काढला. चऱ्होली येथील डॉ.डी.वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने  “वस्तू व सेवा करातून भारताची प्रतिमा उंचावणे व त्या संबंधातील संधी व आव्हाने” या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन चर्होली येथील डॉ.अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठात इसरोचे माजी समूह संचालक डॉ.ए.के. संगल यांच्या हस्ते झाले. यावेळी आयकर विभागाचे सह आयुक्त हेमंत तांतीया, द.कोरियामधील जनयाँग विद्यापीठातील ब्रेन पुल शास्त्रज्ञ डॉ.डी.पी. अमळनेरकर, आंतरराष्ट्रीय आरोग्य आणि संशोधन संस्तेचे अधिष्ठाता डॉ. सुप्तेन सर्बाधिकारी, डॉ. आनंदराय, शार्प इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक टोमियो इसोगायी, महाराजा समूहाचे संचालक डॉ. सतीश शर्मा, डॉ.अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ एकनाथ खेडकर आदी उपस्थित होते.

डॉ. संगल म्हणाले कि, सध्या पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आल्यास महागाई नियंत्रणात येईल. ग्रामीण भागातील नागरीकांच्या मनात जीएसटी बाबतीत भीती आहे. याबाबतीत जनजागृती होणे गरजेचे आहे. तर हि प्रणाली साधी सोपी होण्यासाठी विद्यार्थ्यानी मोबाईल ॲप्सची निर्मिती केली पाहिजे.

सह आयुक्त तांतीया म्हणाले कि, सरकारच्या तिजोरीत तब्बल १८ लाख करोड जीएसटीतून जमा झाले. यातून हजारो विकासकामे होणार आहे. जीएसटीमुळे परकीय गुंतवणुक करण्यासाठी इच्छुक आहेत. पूर्वी ३ करोड करदाते होते. सध्या एक करोड करदाते वाढले.

डॉ. खेडकर म्हणाले कि, स्वातंत्र्य काळानंतर जीएसटीमुळे ऐतिहासिक आर्थिक परिवर्तन झाले. जीएसटीमुळे नोकरीची संधी वाढली. आर्थिक सुधारणा झाली. भविष्यात नक्कीच विकास दर वाढलेला दिसेल. इसोगायी म्हणाले कि, भारत जपान ने हातात हात घालून कार्य करू. जपानी टिमवर्क आणि भारतीय जुगाड टेक्नॉलॉजी यांच्या समन्वयातून वेगळी कलाकृतीची निर्मिती करू. मराठवाडा कॉलेजचे डॉ.श्रीराम नेर्लिकर, एलएम थापर मॅनेजमेंट स्कूलचे डॉ. रूद्रा रामेश्वर, हरियाणाचे डॉ.अमरिक सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयंका शर्मा व सार्थक शुक्ला तर आभार प्रा. इंदू मजुमदार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − 15 =