चौफेर न्यूज –  देशात 1 जुलै पासून जीएस्‌टी कराची अंमलबजावणी करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे.  महिलांचे आरोग्य सुधारण्याच्या गप्पा मारणारे भाजपा सरकार महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या सॅनिटरी नॅपकीनवर 12 टक्के जीएस्‌टी कर 1 जुलै 17 पासून लावणार आहे. हा निर्णय महिलांचे आरोग्य धोक्यात आणणारा आहे.

शहरी मध्यम उत्पन्न गटातील महिला आणि ग्रामिण भागातील महिलांना महागडे सॅनिटरी नॅपकीन घेणे शक्य होणार नाही. सॅनिटरी नॅपकीनवर 12 टक्के कर लावणे म्हणजे स्त्रीत्वाचा अपमान आहे. हा अन्यायकारक कर सॅनिटरी नॅपकीनवर लावला जाऊ नये, अशा मागणीचे पत्र पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी तहसिलदार गीतांजली शिर्के यांना शुक्रवारी  दिले.

यावेळी महिला काँग्रेसच्या सरचिटणीस बिंदू तिवारी, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, शहर उपाध्यक्षा माजी नगरसेविका विद्या नवले, संगिता कळसकर, प्राजक्ता सुरवसे, शोभा मिरजकर, वंदना कुदळे, वैशाली कुदळे आदी उपस्थित होते.

सॅनटरी नॅपकीन जीएस्‌टी मधून वगळावे, तसेच कर्करोग रुग्णांना सॅनिटरी नॅपकीन व आरोग्य सुविधा मोफत द्यावी. शहरातील सर्व माध्यमिक शाळा व महाविद्यांलमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडींग व डिस्पोजेबल मशिन बसवावेत, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 + 15 =