पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवडमधील जैन सोशल ग्रुप डायमंडचा पदग्रहण समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रुपच्या अध्यक्षपदी पंकज गुगळे यांची निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष सुनील शहा यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. तर, लालचंद जैन, आयडी, जेसीआयएफ यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.
यावेळी जेसीआयएफचे माजी अध्यक्ष शरदभाई शहा, इंटरनॅशनल डायरेक्टर मनेश शहा, एमआरसी अध्यक्ष राजेंद्र धोका, उपाध्यक्ष दिलीप मेहता, सचिव डॉ. राजेंद्र दोशी, सहसचिव अमोल झवेरी, पुणे परिवाराचे अध्यक्ष दिलीप चोरबोले, मंजुषा धोका, अंजली चोरबोले आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात उपाध्यक्षपदी अतुल धोका, सचिवपदी प्रशांत गांधी, सहसचिवपदी कमलेश चोपडा, कोषाध्यक्षपदी संतोष छाजेड यांची निवड झाली. तसेच सदस्यपदी संजय कासवा, मीलन पटेल, पवन शहा, विजय मुनोत, कमलेश भळगट, किरण शहा व संजय सोलंकी यांची निवड करण्यात आली. पदग्रहण समारंभानंतर पुढील योजनांविषयी  पंकज गुगळे यांनी माहिती दिली. महावीर जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, मतदान जागृती व पाणी वाचविण्याच्या विशेष उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे. जैन सोशल ग्रुपतर्फे विशेषत्वाने राबवण्यात येणार्‍या एज्युकॉन या शैक्षणिक उपक्रमात आत्तापर्यंत 300 गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना दीड कोटी रुपयांची आर्थिक मदत उच्चशिक्षणासाठी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत गांधी यांनी आभार मानले. मनीषा जैन आणि पवन शहा यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight − 3 =