पिंपरी चिंचवड : शहरात राष्ट्रवादी पक्ष त्यांचे सेनापती व खंदे कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्यामुळे त्रस्त झालेला दिसत आहे. मात्र, पक्ष सोडून गेलेले जुने-जाणते नेतेमंडळी पक्षात परत येत आहेत. तसेच नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचा राबताही राष्ट्रवादीकडे आकर्षित होत आहे. वाकड परिसरातील कस्पटे वस्तीतील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली संपत कस्पटे यांनी गुरुवार (दि. 16) रोजी वाकड येथे माजी उपमुख्यमंत्री व आमदार अजित पवार यांच्या उपस्थितीत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला. यावेळी नगरसेवक मयूर कलाटे, उद्योजक समीर कस्पटे, तानाजी अत्रे, सागर कोकणे व आदी उपस्थित होते. त्यांचे स्वागत करताना अजित पवार म्हणाले की, शहराला आज राष्ट्रवादीच्या विचारांची गरज आहे. गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड शहरात पायाभूत सुविधांसह शहराच्या वैभवात भर घालणारे प्रकल्प उभारले आहेत. शहराच्या स्मार्ट सिटीचे व्हिझन पेलवण्याची ताकद आज राष्ट्रवादीशिवाय अन्य कोणत्याच पक्षात दिसत नाही. शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारांनी भारावून जात, राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भविष्यात राष्ट्रवादी पक्षासाठी माझे बहुमोल योगदान असणार आहे, असे कस्पटे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven − 2 =