चौफेर न्यूजदुकानात येऊन लाईट बंद करून एका ज्येष्ठ महिलेला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत महिलेकडील पिशवीतील सोन्याचे दागिने, रोकड असा 1 लाख 14 हजार रूपयांचा ऐवज लुटून  नेला. ही घटना 12 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.  दिपक बंडू वाघमारे (वय-23, रा. थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 70 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिलेचे क्रांतीवीर नगर येथे फरशीचे दुकान आहे. 12 एप्रिल रोजी आरोपी वाघमारे रात्री साडेआठच्या सुमारास दुकानात आला. दुकानातील लाईट बंद करून आरोपीने महिलेला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत महिलेच्या कमरेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने व रोकड असा  1 लाख 14 हजारांचा ऐवज जबरदस्तीने नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. एस. भोगम अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 + 5 =