चौफेर न्यूज – पात्रता फेरीत खेळताना यूएईकडून ३ गड्यांनी झालेल्या पराभवामुळे झिम्बाब्वेचा सन १९८३ नंतर पहिल्यांदाच २०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न भंगले. झिम्बाब्वेला पुढील वर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकात खेळण्यासाठी कोणत्याही परिस्थिती यूएईला पराभूत करणे आवश्यक होते. पण त्यांचाच पराभव झाला.

आमच्याकडे अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी अनेक संधी चालून आल्या होत्या. आमचा आतापर्यंतचा खेळ चांगला होता. पण आमच्यासाठी आजचा दिवस निराशाजनक ठरला, अशी प्रतिक्रिया झिम्बाब्वेचा कर्णधार ग्रेम क्रिमरने पराभवानंतर दिली. आम्ही अंतिम फेरीत जाऊ याचा आम्हाला विश्वास होता. मला वाटते, असाच विचार बहुतांश लोकांनी केला असेल. पण आमचा पराभव झाला, असेही तो म्हणाला.

झिम्बाब्वेला आयसीसी विश्वचषक पात्रता फेरीतील सुपर सिक्समधील पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात ४० षटकांत २३० धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण त्यांचा संघ ७ गडी गमावून २२६ धावाच करू शकला. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या यूएई संघाने सुरूवातीला मिळालेल्या धक्क्यातून सावरत ४७.५ षटकांत २३५ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेकडून सिकंदर रजा हा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १० षटकांत ४१ धावा देत ३ गडी टिपले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen + ten =