विविध संघटनांचा महापालिकेवर मोर्चा
पिंपरी  ः झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पास उद्यमनगर बचाव कृती समितीने केलेल्या विरोधाचा निषेध करण्यासाठी आणि महापालिकेने या प्रकल्पाचे काम त्वरीत सुरू करावे, या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने बुधवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. उद्यमनगर येथे आरक्षित असलेली घरकुल योजना बेघरांसाठी घरे तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यास  स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. नवीन  गृहप्रकल्पामुळे सामाजिक प्रश्‍नही बळावेल, असे सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध संघटना पुढे सरसावल्या होत्या. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकापासून महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवशंकर उबाळे (भीमशाही युवा संघटना) फारूक कुरेशी (बहुजन प्रेरणा बुध्द सामाजिक ट्रस्ट) अविनाश चौधरी (यशवंतराव पुनर्वसन कृती समिती) अल्ताफ शेख (अल्पसंख्यांक आघाडी आरपीआय, आठवले) अजीज शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 + 13 =