पिंपरी :- सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला महापूराचा मोठा फटाका बसला आहे. लाखों कुटूंबाचा संसार पूराच्या पाण्यात वाहून गेला आहे. सर्वच स्तरातून या पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. पिंपरी चिंचवड मधील टाटा मोटर्सच्या कामगारांनी देखील पूरग्रस्तांना एक मदतीचा हात दिला आहे. टाटा मोटर्स कामगार आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांना देणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे यांनी दिली.

टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनची आज कार्यकारिणीची सभा आज पार पडली. यासभेत महाराष्ट्रातील पुरग्रस्त भाग पुणे, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी आवश्यक असणारी मदत पोहचविण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या टाटा मोटर्समधील सर्व कामगारांचा एक दिवसाचा पगार मदत स्वरूपात देण्याचा निर्णय एकमताने बैठकीत घेण्यात आला. पिंपरी चिंचवड टाटा मोटर्समध्ये ७२०० कामगार आहेत. तर साडेचार हजार स्टाफ आहे. या सर्वांचा एकदिवसाचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीला देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 4 =