चौफेर न्यूज –   वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशनच्या मान्यतेने व वाको महाराष्ट्र यांच्या सौजन्याने टायटल बेल्ट किक बॉक्सिंग स्पर्धेचे 13 ते 15 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे.     ही स्पर्धा संत तुकाराम नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडा संकुल येथे पार पडणार आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन माजी आमदार अण्णा बनसोडे व फेडरेशनचे अध्यक्ष संतोष अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे.

ही स्पर्धा 48, 56, 58, 65, 75 अशा विविध गटात होणार असून हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल, उत्तर प्रदेश, पंजाब आदी राज्यातील 200 महिला व पुरूष खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.  प्रथम क्रमांकाच्या खेळाडूला 20 हजार, द्वितीय क्रमांकास 10 हजार, तृतीय क्रमांकास 5 हजार रूपयांसह प्रत्येकाला स्मृतीचिन्ह  देण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − two =