चौफेर न्यूज – भरधाव वेगातील ट्रकची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. पुणे आळंदी रोडवर चहोली फाट्यावर  गुरूवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास हा अपघात घडला. प्रशांत राजेंद्र कोतवाल (वय 21, रा. दाभाडे वस्ती, चहोली बुद्रूक) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. दिघी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पी. ए. कदम यांनी फिर्याद दिली आहे.

मयत प्रशांत आपल्या दुचाकीवरून घरी जात होता. चऱ्होली फाट्याकडून चऱ्होलीगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तनिष्क ऑर्चिड सोसायटीच्या वळणावर तो आला. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकची जोरदार धडक त्याच्या दुचाकीला बसली. त्यात गंभीर जखमी झालेल्या प्रशांतचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक एस. जी. शेंडगे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 + nineteen =